Wednesday, 20 April 2016

येरळा नदी पुनरुज्जीवन

सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात खटाव तालुक्या्च्या उत्तरेस सेवागिरी
महाराजाच्या वास्तवाने पवित्र झालेल्या भूमितून येरळा नदी मांजरवाडी
येथील डोंगरामध्ये उगम पावते. खटाव तालुक्याजचे सरासरी पर्जन्यमान 300 ते
400 मि.मी. असून सातारा जिल्हयातील सर्वात कमी पावसाच्या कायमस्वरुपी
दुष्काळी भागामध्ये समावेश होतो.
नदीचे उगमापासून 17 किमी अंतरावर ब्रिटीशकालीन नेर मध्यम प्रकल्प असून सन
1937 मध्ये बांधण्यात आला आहे. परंतु सध्या नेर मध्यम प्रकल्पामध्ये
मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने प्रकल्पाच्या जिवंत पाणी साठ्यामध्ये
लक्षणीय घट झालेली आहे. नेर मध्यम प्रकल्पापासून येरळा नदी पात्राची
रुंदी 60 मीटर ते 80 मीटर असून नदी पात्र गाळाने भरले आहे त्यामुळे
पावसानंतर डिसेंबरपासून नदीपात्र कोरडे पडलेले असते. नदीपात्रामध्ये
मोठया प्रमाणात गाळ साचल्याने नदी प्रवाहात पाणी टिकून राहत नाही.
त्यामुळे येरळा नदी पात्राच्या दोन्ही तीरावरील पाणी पातळी खोल गेलेली
आहे. येरळा नदी काठावरील नेर, पुरेगाव, काटकरवाडी, खातगुण, खटाव,
भुरकवाडी, वाकेश्वतर, वडूज, गणेशवाडी, अंबवडे,गोरेगांव, कमदवाडी, निमसोड,
शितोळेवाडी, चितळी या गावामध्ये नेहमी पाणी टंचाई भासत असते.

नेर मध्यम प्रकल्पापासून 36.50 किमी अंतरावर खटाव तालुक्याडमध्ये सन 1972
च्या दुष्काळामध्ये येरळवाडी मध्यम प्रकल्पाचे बांधकाम झालेले आहे. नेर
धरणाच्या खालील बाजूस 5 व येरळवाडी मध्यम प्रकल्पाच्या खालील बाजूस 4 असे
एकूण 9 सिमेंट कॉंक्रीट बंधारे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.

येरळा नदीचा उगम मांजरवाडी येथील डोंगरात होत असून नेर मध्यम
प्रकल्पापर्यंत नदीची लांबी सुमारे 17 किं.मी. एवढी आहे. या अंतरामध्ये
नदीच्या तीरावर मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, शिंदेवाडी, ललगुण, नागनाथवाडी,
काटेवाडी इत्यादी गावे येतात. त्यानुसार मांजरवाडी, मोळ, डिस्कळ,
शिंदेवाडी, ललगुण येथे 11 सिमेंट कॉंक्रिट बंधारे प्रस्तावित करण्यात येत
आहेत. सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम रु.390 लक्ष एवढी आहे.
माणंगगा नदीप्रमाणे येरळा नदीसाठीही जलसंधारण विभागाचे सचिव श्री.
प्रभाकरजी देशमुख यानी अथक परिश्रम घेऊन ही योजना मार्गी लावली.

माणगंगा व येरळा या नद्यांवर सिमेंट नाला बांध बांधण्याचा कार्यक्रमास
शासनाने डिसेंबर 2015 मान्यता दिली आहे.

येरळा नदीवरील मंजूर सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्याच्या कामांना शासनाने
अपेक्षित खर्च 5 कोटी एवढा मंजूर केला आहे. त्यानुसार 2015-16 या
वर्षामध्ये रु. 2 कोटी 50 लाख निधी सरकारने डिसेंबर 2015 ने उपलब्ध करून
दिलेला आहे.

सदर मंजूर प्रस्तावित कामांची निविदा कार्यवाही सुरु आहे. येरळा नदीवरील
मंजूर 9 सिमेंट कॉंक्रीट बंधारे मार्च 2016 अखेर पूर्ण करण्याचे नियोजित
आहे. प्रशासकीय मान्यता योजनांचा तपशील खालील प्रमाणे

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत मंजूर कामे (नेर धरणाच्या खालील बाजूस)

सिमेंट कॉंक्रीट      तालुका      लांबी       अंदाज-पत्रकीय  पाणीसाठी
         सिंचन
बंधारा                                मी.            किंमत
रु.लक्ष स.घ.मी.    क्षमता हे

नेर क्र.2              खटाव       32             32.31
31.54              10
पुसेगाव क्र.1        खटाव       18             17.54             16.05
               5
भांडेवाडी क्र.1       खटाव       20             22.66
27.41               8
खटाव क्र.3          खटाव       35             21.1               20.26
               7
खटाव क्र.4          खटाव      35              29.92             25.51
              8
अंबवडे क्र.2         खटाव      75             70.96              52.88
             16
गोरेगाव क्र.2       खटाव       60            56.43              49.45
             15
मरकवाड क्र.2      खटाव       70            40.63               41.36
           12
निमसोड क्र.2      खटाव       75             51.89               51.31
          15

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत उगम (मांजरवाडी) ते नेर धरण या
17 कि,मी. अंतरामध्ये खालीलप्रमाणे नव्याने 11 सिमेंट कॉंक्रीट बंधारे
प्रस्तावीत करण्यात येत असून रु. 3कोटी 90 लाख एवढ्या निधीची आवश्य कता
आहे.

सिमेंट कॉंक्रीट         तालुका      लांबी      अंदाज-पत्रकीय
पाणीसाठा           सिंचन
बंधारा                                   मी.       किंमत रु.लक्ष
स.घ.मी.          क्षमता हे.
मांजरवाडी क्र.1       खटाव         15            16.00
25.00                5
माजरवाडी क्र.2       खटाव         15            16.00            25.00
               5
मोळ क्र.1              खटाव         20            22.00
35.00               8
मोळ क्र.2              खटाव         20            22.00
35.00               8
डिस्कळ क्र. 1         खटाव          35           42.00
60.00             12
डिस्कळ क्र.2          खटाव         35            42.00
60.00             12
शिंदेवाडी                खटाव        36             45.00
60.00             12
ललगुण क्र.1          खटाव        36             45.00            60.00
            12
ललगुण क्र.2          खटाव        36             45.00            60.00
            12
ललगुण क्र.3          खटाव        36             45.00            60.00
            12
ललगुण क्र.4         खटाव         36             50.00            60.00
            12

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत प्रशासकीय मान्यता असलेल्या नेर
धरणाच्या खालील बाजूकडील 9 सिमेंट कॉक्रीट बंधारे कामांची निविदा
कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदरील कामे मार्च 2016 अखेर पूर्ण करण्याचे
नियोजन आहे. शासनाने वितरीत केलेला 2 कोटी 50 लाख निधी खर्च कऱ्ण्याचे
प्रस्तावित आहे.

येरळा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम अंतर्गत नव्याने प्रस्तावित असलेल्या
नेर धरणाच्या वरील बाजू कडील कामांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
या कामांना शासनाने 3 कोटी 90 लाख एवढा निधी उपलब्ध करून दिल्यास सदरील

कामे जून 2016 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

माणगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण-दहिवडी तालुक्याूतील कुळकजाई
या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशे पासष्ट किलोमीटर
लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा व कृष्णा या नद्यांची उपनदी आहे.
सातारा,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीच्या परिसराला
माणदेश म्हणून ओळखला जातो. उगमस्थळी डोंगराच्या पोटातून वाहणारे पाणी,
उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, उंच झाडांनी नटलेला परिसर, त्या
ठिकाणची पुरातन मंदिरे, औषधी वनस्पती असलेला हा परिसर पूर्वी दंडकारण्य
म्हणून ओळखला जात होता. परंतु आता नदीक्षेत्रात पर्यावरण पूरक उपयुक्त
झाडे नाहीत. त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे.

कुळकजाई डोंगरामध्ये बहुतांश भाग दगडी व खडकाळ स्वरुपाचा असल्याने या
ठिकाणी पाणी मुरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या खडकांना ठरावीक भागात
मुरमाप्रमाणे स्तर असल्याने नदीकाठच्या विहिरी व विंधन विहिरींची
पाण्याची पातळी नेहमी वाढते. पण पुढे दुष्काळी भागात माण नदीला पाणी
नसल्याने पात्रात असंख्य काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात उगवतात. अशी ही
नदी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातून वाहते.

तालुक्याुचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा व चाऱ्याचा प्रश्नल
सोडविण्यासाठीचा जलसंधारणाचा उपाय म्हणून तालुक्याुतून वाहणाऱ्या माणगंगा
या मुख्य नदीचे पुनरुज्जीवन करणे होय. माणगंगा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास
या नदीच्या खोऱ्यातील सर्व भागामधील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास
निश्चिपतच मदत होईल व दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात करणे शक्यर
होईल. ही बाब लक्षात घेऊन श्री. प्रभाकर देशमुख यांनी नदीला गतवैभव
प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. एवढेच नव्हे तर त्यासाठी घसघशीत
निधीची तरतूद केली.

कायमस्वरूपी दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्याहतील सरासरी पर्जन्यमाम
250 मि.मी. इतके आहे. येथील पाऊस अनियमित आणि कमी प्रमाणात असल्याने
तालुक्याोला बहुतेक वेळा दुष्काळामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची
तीव्र समस्या जाणवते. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने फेब्रुवारी
महिन्यापासूनच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शेतीसाठी पुरेसे पाणी
उपलब्ध नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्नर निर्माण होतो व
काही वेळा चारा छावण्याही सुरु करावा लागतात.

अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा
प्रस्ताव हाती घेण्यात आला आहे. 'सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त
महाराष्ट्र, जलयुक्त शिवार अभियान'या महाराष्ट्र शासनाच्या
महत्त्वकांक्षी योजनाअंतर्गत विविध संस्था, प्रशासन व लोकसहभागातून विविध
जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.रानमाळा, दहिवडी, भांडवली,
पांगरी, इंजबाव, शेरेवाडी, मार्डी या गावांमध्ये लोकसहभागातून मोठी कामे
सुरू आहेत. पूर्ण, प्रगतीपथावरील व प्रस्तावीत कामांमुळे 13 हजार 613
टी.एम.सी. इतका पाणीसाठी होणार असून त्याचा लाभ जवळपास 70 गावामधील 90
हजार लोकसंख्येला होणार आहे. त्यामुळे 3 हजार 318 हेक्टतर इतके क्षेत्र
सिंचनाखाली येणार आहे.

शासनाचे लघुसिंचन विभागामार्फत 11 गावांमध्ये 12 सिमेंट नाला बांधकामे
पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे 341 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला
असून 71 हेक्टणर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच सदर
विभागामार्फत 4 कामे सुरू असून त्याद्वारे 114 टी.सी.एम. इतका पाणीसाठी
होणार असून 22 हेक्टरर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

शासनाच्या कृषी विभागामार्फत पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत 67 गावांमध्ये
सिमेंट व माती नाला बांधाची एकूण 821 कामे पूर्ण झाली आहेत. त्याद्वारे
5225 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला आहे. तसेच प्रस्तावीत 1 हजार 526
कामांतर्गत 8320 टी.सी.एम. इतका पाणीसाठी निर्माण होणार आहे. कृषी
विभागाकडील पूर्ण व प्रस्तावीत कामांमुळे 2660 हेक्टटर इतके क्षेत्र
ओलीताखाली येणार आहे.

तालुक्याेची पूर्ववाहिनी असणाऱ्या माणगंगा नदीवर असलेले कोल्हापूर
पद्धतीचे बंधारे (के.टी.विअर) नादुरुस्त झाले असून मोठ्या प्रमाणात वाळू
व मातीचे थर साचले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यामध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठी
होत नाही व त्याचा अपेक्षीत लाभ मिळत नाही. सदर अस्तित्वात असलेले 17
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करणे व नदीतील गाळ काढणे आवश्यमक आहे.

निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांचेकडील 17 कोल्हापूर पद्धतीचे
बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी रु.1 कोटी 70 लाख एवढ्या निधीची आवश्य,कता
आहे. सदर दुरुस्ती केल्यानंतर 1 हजार 965 टी.सी.एम. इतका पाणीसाठी होवून
19 गावातील 587 हेक्टकर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

माणगंगा नदीवर कुळकजाई ते पळशी दरम्यान एकूण 19 सिमेंट कॉंक्रीट बंधारे
लघुसिंचन (जलसंधारण) या विभागाकडून प्रस्तावीत असून त्यापैकी भांडवली, व
दहीवडी (पाणीपुरवठा विहीरीजवळ) येथील बंधारे स्वयंसेवी संस्था व
लोकसहभागातून प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत 17 सिमेंट कॉंक्रीट
बंधाऱ्यांसाठी 9 कोटी 26 लाख इतका निधी आवश्योक असून 1 हजार 876
टी.सी.एम. इतका पाणीसाठी निर्माण होऊन 535 हेक्टतर क्षेत्र सिंचनाखाली
येणार आहे.

माणगंगा नदीचे पुनरुजीवनांतर्गत 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त
करणे, नवीन 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे प्रस्तावीत असून
त्यासाठी रु. 10 कोटी 96 इतक्यास निधीची आवश्यठकता आहे. सदर कामांमुळे 3
हजार 841 टी.सी.एम इतका पाणीसाठी होणार असून त्याद्वारे 1 हजार 122
हेक्ट्र क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

उपाय-उगमस्थळापासून तीस किलोमीटरपर्यंत वृक्षवेली सुरक्षित आहेत. परंतु
त्याखाली संपूर्ण नदीक्षेत्रात पर्यावरण उपयुक्त अशी झाडे राहिली नाहीत.
त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे. नदीकाठी दोन्ही बाजूला
असणाऱ्या वृक्षवेली नष्ट झाल्या आहे.

1. वृक्ष लागवड- झाडे नष्ट झाल्यामुळे माणनदीच्या परिसरात सध्या पाणी
मुरत नाही. त्यासाठी वृक्ष लागवड करणे हा एकमेव उपाय इसून डोंगरमाथ्यावर
व उतारावर लिंब, चिंच, करंज अशा जातींच्या झाडांची लागवड करावी.
नदीपात्रात ओघळलेला गाळ नदीपात्राच्या काठावर भरून घ्यावा व नदीकाठच्या
उतारावर अशा झाडे लावावित.

2. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती- माण नदीच्या उगमापासून ते
संगमापर्यंत एकशेपासष्ट किलोमीटरमध्ये नदीपात्रात चौतीस को.प.बंधारे
आहेत. माणनदी ही अतिउताराने वाहणारी नदी असल्याने तिच्या पाण्याचा
प्रवाहाचा वेग जास्त असल्याने, बंधाऱ्यात पाणीसाठ्याऐवजी माणकट मातीचे थर
चढल्याने, काटेरी झुडपे व उपद्रवी वनस्पतींची वाढ झाल्याने, बंधाऱ्याच्या
पाणीसाठ्यात घट झाली आहे.

3. वाळूबचाव- माणगंगा वाचवायची असेल तर त्या नदीने स्वत:च्या
अस्तित्वासाठी व मानवी वस्ती उपयुक्ततेसाठी शेकडो वर्षांपासून तयार
केलेली नदीपात्रातील वाळू वाचवली पाहिजे. नदीपात्राचा काही ठिकणाचा भाग
सोडला तर वीस ते तीस फूट खोलीपर्यंत वाळू आहे. पण नदीपात्रात वाळूचोरी,
विक्री व तस्करी सुरु आहे. स्थानिक बांधकामासाठी लागणार वाळू नदीपात्रातच
चाळून उपयुक्त तेवढी वाळू न्यावी पण याकडे दुर्लक्ष होत आहे.

4. नद्यांतील अतिक्रमणे- नदीशेजारच्या शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी
अतिक्रमणे करून नदीपात्र संपुष्टात आणले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:
हून नदीपात्रातील अतिक्रमणे काढली पाहिजेत. त्यासाठी शासन स्थरावर कारवाई
करणे आवश्य्क आहे. नदीपात्र सुरक्षित राहिले तर पाणीसाठ्यात वाढ होऊ
शकते.

5. उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन- माणदेशात शोक समिंदर नावाची विषारी
उपद्रवी वनस्पती उगवते. ही वनस्पती कितीही दिवस पाणी नसले तरी नरत नाही.
पसरट पाने, फिक्कट गुलाबी पांढरी फुले व पोकळ खोड मात्र केसाळ मुळे
असलेल्या या वनस्पतीचे वेळीच निर्मूलन करणे गरजेचे आहे.

6. नदी पात्रात सोडले जाणारे घाणपाणी- नदीकाठच्या गावे उंचवट्यावर , तर
उतार नदीरडे असल्याने सांडपाणी गटारांद्वारे नदीपात्रात सोडले जाते.
त्यासाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या गटारीच्या बाजूला दहादहा फुटांचे
शोषखड्डे तयार करून गटारीतून वाहणारे पाणी विभागून या शोष खड्‌यात सोडले
तर नदीकडे जाणारे घाण पाणी थांबेल व या ठिकाणच्या मोकळ्या जागेत
वृक्षलागवड करावी.
नदीपात्रात निरुपयोगी साहिती, वस्तू टाकण्यापासून लोकांना परावृत्त केले पाहिजे.
संपूर्ण कार्यात शासन, समाज यांचा सहभाग लाभला पाहिजे. कारण या कामाची
व्याप्ती मोठी आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्ती, आवडीने ग्रामस्थांनी या

नद्याचे पुनरुज्जीवन केले तरच पुढच्या पिढीला याचा लाभ होणार आहे.

Thursday, 14 April 2016

स्वप्न शिवाराचे…दुष्काळमुक्तीचे (हाराष्ट्र टाइम्स – २० सप्टेंबर २०१५)

स्वप्न शिवाराचे…दुष्काळमुक्तीचे


विजय चोरमारे

पाण्याची उपलब्धता नसेल तर गावात राहणे मुश्किल आणि गाव सोडणे त्याहून मुश्किल
याची जाणीव लोकांना होऊ लागली. त्यातूनच जलयुक्त शिवाराची लोकचळवळ गतिमान
बनली. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या या योजनेचा
लेखाजोखा.

महाराष्ट्रात गेले काही महिने जलयुक्त शिवार योजनेचा बोलबाला सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत असे म्हटले जाते की, एकतर ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे परदेशात असतात किंवा महाराष्ट्रात असले
तर कुठल्या तरी जलयुक्त शिवार योजनेची पाहणी करीत असतात. दस्तुरखुद्द
मुख्यमंत्र्यांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्या यंत्रणा
त्यामागे धावणे साहजिक आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार
असल्याचे स्वप्न दाखवले जाते. दुष्काळमुक्तीसाठी आतापर्यंत अनेक योजना
राबवल्या गेल्या. अनेक कमिट्या नेमल्या आणि अहवाल सादर झाले. तरीही
दुष्काळाच्या संकटाने महाराष्ट्राची पाठ सोडलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये
देवेंद्र फडणवीस सगळी कामे सोडून या एकाच योजनेच्या मागे धावताहेत आणि
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न दाखवताहेत. अनेकांना फडणवीस यांचा हा
भाबडेपणा वाटतो. गेल्या पंचावन्न वर्षात झाले नाही, ते होऊ शकेल असा विश्वास
फडणवीस यांना कसा काय वाटू शकतो ? त्यांचा विश्वास सार्थ ठरू शकतो ?

त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची संकल्पना समजून घ्यावी लागेल.

राज्याचे जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली
आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना देशमुख यांनी
राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण योजना राबवली होती. जिल्हा परिषदेच्या शाळांमधे
शिकणाऱ्या मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी तो कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला होता
आणि नंतर तो राज्यसरकारनेही स्वीकारला होता. पुढे देशमुख पुणे विभागाचे आयुक्त
असताना त्यांना एका कार्यकर्त्याने पत्र पाठवून ‘जलयुक्त गाव’ सारखी योजना
राबवण्याची सूचना केली. त्या सूचनेची दखल घेऊन त्यांनी पुणे विभागातील पाच
जिल्ह्यांमध्ये ‘जलयुक्त गाव’ योजना राबवली. याच योजनेचे विस्तारित आणि अधिक
व्यापक स्वरूप म्हणजे ‘जलयुक्त शिवार योजना.’

लोकसहभागातून ग्रामविकास, हे सूत्र महाराष्ट्रासाठी नवे नाही. हेच सूत्र घेऊन
पंधरा वर्षांपूर्वी आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
सुरू केले आणि त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलून गेला.
गावागावांतील लोकांनी उपक्रमशीलतेबरोबरच प्रयोगशीलतेचे दर्शन घडवले. या
अभियानात प्रभाकर देशमुख यांच्या लोधवडे (जि. सातारा) या गावाने लक्षणीय
कामगिरी बजावली. आजुबाजूची गावे दुष्काळाने मेटाकुटीला येत असताना लोधवडे
मात्र पर्जन्यछायेतल्या गावासारखे दिमाखात मिरवत असते. लोधवडे गावात
लोकसहभागातून पाणलोटाची कामे झाली असून १२ बंधारे केले आहेत. दुष्काळी
भागातल्या या गावात सहाशे हेक्टर बागायत शेती आहे. २०११-१२ आणि २०१२-१३ या
वर्षांत पाऊस जेमतेम झाला होता, तेव्हाही लोधवडे गावाला पाणीटंचाई जाणवली
नाही. उलट स्वतःची पिण्याची आणि शेतीची गरज भागवून गावातून रोज सात टँकर पाणी
अन्य गावांना पाठवले जात होते.

स्वतःच्या गावात स्वतःच्या प्रयत्नातून केलेला यशस्वी प्रयोग गाठिशी होता आणि
तसेच प्रयोग आणखी काही गावांतून झाले होते. दुष्काळात रडगाणे गात न बसता
त्यावर मात करता येते, हे सिद्ध झाले होते. ‘जलयुक्त शिवार’ योजना अशा अनेक
प्रयोगांतून आकाराला आली.

जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रात क्रांती घडत असल्याची चर्चा केली जाते.
त्यातला प्रचारकी भाग बाजूला ठेवला तरी काही चांगल्या गोष्टी त्यामध्ये नक्कीच
आहेत. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तसे नवीन काहीच नाही. जलसंधारणासंदर्भातील
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्या एकेकट्या
राबवल्या जात होत्या. एकात्मिक पाणलोट विकास योजना, बंधारे, साठवण बंधारे,
महात्मा फुले जलभूमी अभियान अशा सगळ्या योजना एकत्रित करून त्यातून जलयुक्त
शिवार योजना आकाराला आली.

एकाचवेळी संपूर्ण राज्यात ही योजना न राबवता पहिल्या वर्षी ६२०० गावांची निवड
करण्यात आली आहे. ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवते, जिथे नेहमी टँकरने
पाणीपुरवठा करावा लागतो किंवा जेथील पाणीपातळी खूपच खाली गेली आहे, अशा
गावांना प्राधान्य देण्यात आले. निवड केल्यानंतर त्या त्या गावाच्या पाण्याचे
अंदाजपत्रक तयार करण्यात आले. म्हणजे त्या गावची लोकसंख्या किती, त्यांना
पिण्यासाठी किती पाण्याची गरज आहे, जनावरांसाठी किती पाणी लागणार आहे आणि
पिकांसाठीची गरज किती आहे इत्यादी इत्यादी. संबंधित गावात किती पाणी उपलब्ध
होते याचा अंदाज घेऊन मग उपलब्धता आणि गरज यातला फरक लक्षात घेऊन उपाययोजना
ठरवल्या जातात. हा फरक भरून काढण्यासाठी दोन पर्याय असतात. एक – पाण्याचे जुने
साठे पुनरुज्जीवित करणे. म्हणजे बंधारे, साठवण तलाव, ओढे गाळाने भरले असतील तर
त्यातील गाळ काढून ते मूळ स्वरुपात आणणे. दोन – नव्याने आवश्यकतेनुसार बंधारे,
साठवण तलाव बांधणे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या जलसंधारणाशी संबंधित ज्या काही योजना आहेत, त्या
योजना एकात्मिक रितीने जलयुक्त शिवार योजनेत राबवण्याचे ठरले. त्यानुसार
गावनिहाय अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. केंद्र-राज्याच्या योजनांचे पैसे
एकत्रित करूनही काही ठिकाणी रक्कम कमी पडत होती, तो गॅप भरून काढण्यासाठी
राज्यसरकारने एक हजार कोटींची तरतूद केली.

योजना राबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले.
त्यांनीच गावे निवडायची. त्यांनीच आराखडा तयार करायचा आणि त्यांच्याच
निगराणीखाली कामे करायची. सगळे अधिकार त्यांना देऊन आवश्यक निधीही
त्यांच्याकडेच सोपवण्यात आला. एकात्मिक पाणलोट विकास योजना हा या योजनेचा
मूलाधार ठेवला. त्याला पूरक अशी सिमेंट बंधाऱ्यांची साखळी उभारण्यावर भर
देण्यात आला. जी जुनी साठवणुकीची ठिकाणे होती, ती दुरुस्त करून घेतली.
त्यासाठी लोकसहभाग घेतला. लोकांना आवाहन करण्यात आले की, तुम्ही मशीनरी आणून
गाळ काढून घ्या, त्यासाठीचा डिझेल वगैरेचा खर्च सरकार देईन. अशा प्रकारे
लोकसहभागातून गेल्या सहा महिन्यांत सुमारे अडीचशे कोटींची कामे उभी राहिली
आहेत. लोकसहभाग आणि सरकारी प्रयत्नांतून नद्या-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण
अशी सुमारे बाराशे किलोमीटर्सची कामे झाली आहेत.

राजेंद्रसिंह राणा यांच्यासारख्या जलतज्ज्ञाने अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन
लोकांना सहभागासाठी आवाहन केले. सततच्या आवाहनामुळे आणि जाणीवजागृतीमुळे
लोकांना योजनेचे महत्त्व पटू लागले. पाण्याची उपलब्धता नसेल तर आपणास गावात
राहणे मुश्किल आहे आणि गाव सोडणे त्याहून मुश्किल याची जाणीव लोकांना होऊ
लागली. त्यातूनच ही लोकचळवळ सुरू झाली. काही गावांनी ओढा, नदीमध्ये पाच-दहा
किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण केले आहे.

सर्वसाधारणपणे एका ठिकाणी पाणीसाठा करून तेथून दुसरीकडे पाणी नेण्याचा प्रयत्न
आपल्याकडे केला जातो. परंतु या योजनेअंतर्गत विकेंद्रीत पाणीसाठे करण्यास
प्राधान्य देण्यात आले. त्याद्वारे त्या त्या ठिकाणची भूगर्भातील पाणीपातळी
वाढवण्यात आली.

लोकांच्यापुढची अडचण काय असते, तर पावसाला मोठा खंड पडतो तेव्हा पीक वाया
जाते. अशा अडचणीच्या काळात पिकाला एक किंवा दोनदा पाणी देण्याची गरज असते.
पाणी संरक्षित करून किंवा साठवून ठेवले तर पिके वाचवता येतात. आपण पेरणी
केल्यानंतर दोन महिन्यांनी पिकांना पाणी देता येईल, याची खात्री असेल तर
शेतकरी निर्धास्त बनेल. जलयुक्त शिवार योजना ही अशीच शेतकऱ्यांना निर्धास्त
बनवणारी असल्याची सरकारची धारणा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री विजय शिवतारे या सगळ्यांच्या
दृष्टीने ही महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त
होऊ शकतो, असा विश्वास त्यांना वाटतो.

आतापर्यंतचा अनुभव पाहता कोणत्याही योजनेच्या चिरंतनतेबाबत शंका वाटल्यावाचून
राहात नाही. ज्या गावांनी ग्रामस्वच्छतेत क्रमांक पटकावले त्यातल्या अनेक
गावांचे लवकरच उकिरडे बनले. सामाजिक सलोख्यासाठीची बक्षिसे घेतलेल्या गावांत
तणाव वाढले. म्हणजे लोक स्पर्धेपुरतेच एकत्र येतात. स्पर्धा संपली की पुन्हा
राजकारण उफाळून येते आणि प्रत्येकाची वाट वेगळी बनते. अशा परिस्थितीमध्ये
जलयुक्त शिवार योजनेच्या चिरंतनतेवर विश्वास कसा ठेवायचा?

लोकांचा सहभाग वाढला की योजना टिकावू बनते, अशी राज्यकर्त्यांची धारणा आहे.
पहिल्या टप्प्यात पाण्याच्या गरजेनुसार योजना पूर्ण करायची. आणि दुसऱ्या
टप्प्यात ती लोकांच्या ताब्यात द्यायची. योजना लोकांच्या ताब्यात देताना
पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबतही जाणीवजागृती करण्यात येणार आहे. कारण
पाण्याचा सुनियोजित वापर हीसुद्धा या सगळ्या प्रक्रियेतली महत्त्वाची बाब आहे.

एकीकडे जलयुक्त शिवार योजनेसाठी मुख्यमंत्री सुसाट निघाले असताना विरोधी
पक्षांकडून या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचेही आरोप होऊ लागले.
गैरव्यवहाराच्या तक्रारी येऊ लागल्या. परंतु सरकारचे म्हणणे असे आहे की,
योजनेतील कामाचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. क्वालिटी मॉनिटरिंग
आहेच, शिवाय थर्ड पार्टी इन्स्पेक्शनही आहे. ग्रामपंचायतीचे ना हरकत
प्रमाणपत्र असल्याशिवाय कामाचे शेवटचे बिल दिले जात नाही. गावातल्या लोकांच्या
सहभागातूनच कामे होणार असल्यामुळे गैरव्यवहाराला जागा नाही. त्यातूनही कुठे
तक्रार आली तर तातडीने कारवाई केली जाते. अशी काही तडकाफडकी निलंबनेही झाली
आहेत.

योजनेच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत लक्ष
आहे. योजनेअंतर्गत दरवर्षी पाच हजार गावांची निवड करून पाच वर्षांत राज्यातील
२५ हजार गावांना दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. हे स्वप्न
प्रत्यक्षात येईल की स्वप्नच राहील, याच्या उत्तरासाठी किमान पाच वर्षे

थांबावे लागेल.