Wednesday 20 April 2016

माणगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प

माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण-दहिवडी तालुक्याूतील कुळकजाई
या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशे पासष्ट किलोमीटर
लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा कृष्णा या नद्यांची उपनदी आहे.
सातारा,सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीच्या परिसराला
माणदेश म्हणून ओळखला जातो. उगमस्थळी डोंगराच्या पोटातून वाहणारे पाणी,
उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, उंच झाडांनी नटलेला परिसर, त्या
ठिकाणची पुरातन मंदिरे, औषधी वनस्पती असलेला हा परिसर पूर्वी दंडकारण्य
म्हणून ओळखला जात होता. परंतु आता नदीक्षेत्रात पर्यावरण पूरक उपयुक्त
झाडे नाहीत. त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे.

कुळकजाई डोंगरामध्ये बहुतांश भाग दगडी खडकाळ स्वरुपाचा असल्याने या
ठिकाणी पाणी मुरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या खडकांना ठरावीक भागात
मुरमाप्रमाणे स्तर असल्याने नदीकाठच्या विहिरी विंधन विहिरींची
पाण्याची पातळी नेहमी वाढते. पण पुढे दुष्काळी भागात माण नदीला पाणी
नसल्याने पात्रात असंख्य काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात उगवतात. अशी ही
नदी सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातून वाहते.

तालुक्याुचा पिण्याचा पाण्याचा, शेतीचा चाऱ्याचा प्रश्नल
सोडविण्यासाठीचा जलसंधारणाचा उपाय म्हणून तालुक्याुतून वाहणाऱ्या माणगंगा
या मुख्य नदीचे पुनरुज्जीवन करणे होय. माणगंगा नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास
या नदीच्या खोऱ्यातील सर्व भागामधील भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास
निश्चिपतच मदत होईल दुष्काळी परिस्थितीवर कायम स्वरुपी मात करणे शक्यर
होईल. ही बाब लक्षात घेऊन श्री. प्रभाकर देशमुख यांनी नदीला गतवैभव
प्राप्त करून देण्याचा चंग बांधला. एवढेच नव्हे तर त्यासाठी घसघशीत
निधीची तरतूद केली.

कायमस्वरूपी दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्याहतील सरासरी पर्जन्यमाम
250 मि.मी. इतके आहे. येथील पाऊस अनियमित आणि कमी प्रमाणात असल्याने
तालुक्याोला बहुतेक वेळा दुष्काळामुळे पिण्याच्या सिंचनाच्या पाण्याची
तीव्र समस्या जाणवते. पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने फेब्रुवारी
महिन्यापासूनच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शेतीसाठी पुरेसे पाणी
उपलब्ध नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्नर निर्माण होतो
काही वेळा चारा छावण्याही सुरु करावा लागतात.

अशा समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा
प्रस्ताव हाती घेण्यात आला आहे. 'सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त
महाराष्ट्र, जलयुक्त शिवार अभियान'या महाराष्ट्र शासनाच्या
महत्त्वकांक्षी योजनाअंतर्गत विविध संस्था, प्रशासन लोकसहभागातून विविध
जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.रानमाळा, दहिवडी, भांडवली,
पांगरी, इंजबाव, शेरेवाडी, मार्डी या गावांमध्ये लोकसहभागातून मोठी कामे
सुरू आहेत. पूर्ण, प्रगतीपथावरील प्रस्तावीत कामांमुळे 13 हजार 613
टी.एम.सी. इतका पाणीसाठी होणार असून त्याचा लाभ जवळपास 70 गावामधील 90
हजार लोकसंख्येला होणार आहे. त्यामुळे 3 हजार 318 हेक्टतर इतके क्षेत्र
सिंचनाखाली येणार आहे.

शासनाचे लघुसिंचन विभागामार्फत 11 गावांमध्ये 12 सिमेंट नाला बांधकामे
पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे 341 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला
असून 71 हेक्टणर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच सदर
विभागामार्फत 4 कामे सुरू असून त्याद्वारे 114 टी.सी.एम. इतका पाणीसाठी
होणार असून 22 हेक्टरर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

शासनाच्या कृषी विभागामार्फत पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत 67 गावांमध्ये
सिमेंट माती नाला बांधाची एकूण 821 कामे पूर्ण झाली आहेत. त्याद्वारे
5225 टी.सी.एम.पाणीसाठी निर्माण झालेला आहे. तसेच प्रस्तावीत 1 हजार 526
कामांतर्गत 8320 टी.सी.एम. इतका पाणीसाठी निर्माण होणार आहे. कृषी
विभागाकडील पूर्ण प्रस्तावीत कामांमुळे 2660 हेक्टटर इतके क्षेत्र
ओलीताखाली येणार आहे.

तालुक्याेची पूर्ववाहिनी असणाऱ्या माणगंगा नदीवर असलेले कोल्हापूर
पद्धतीचे बंधारे (के.टी.विअर) नादुरुस्त झाले असून मोठ्या प्रमाणात वाळू
मातीचे थर साचले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यामध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठी
होत नाही त्याचा अपेक्षीत लाभ मिळत नाही. सदर अस्तित्वात असलेले 17
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करणे नदीतील गाळ काढणे आवश्यमक आहे.

निरा उजवा कालवा विभाग, फलटण यांचेकडील 17 कोल्हापूर पद्धतीचे
बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी रु.1 कोटी 70 लाख एवढ्या निधीची आवश्य,कता
आहे. सदर दुरुस्ती केल्यानंतर 1 हजार 965 टी.सी.एम. इतका पाणीसाठी होवून
19 गावातील 587 हेक्टकर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

माणगंगा नदीवर कुळकजाई ते पळशी दरम्यान एकूण 19 सिमेंट कॉंक्रीट बंधारे
लघुसिंचन (जलसंधारण) या विभागाकडून प्रस्तावीत असून त्यापैकी भांडवली,
दहीवडी (पाणीपुरवठा विहीरीजवळ) येथील बंधारे स्वयंसेवी संस्था
लोकसहभागातून प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत 17 सिमेंट कॉंक्रीट
बंधाऱ्यांसाठी 9 कोटी 26 लाख इतका निधी आवश्योक असून 1 हजार 876
टी.सी.एम. इतका पाणीसाठी निर्माण होऊन 535 हेक्टतर क्षेत्र सिंचनाखाली
येणार आहे.

माणगंगा नदीचे पुनरुजीवनांतर्गत 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त
करणे, नवीन 17 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधणे प्रस्तावीत असून
त्यासाठी रु. 10 कोटी 96 इतक्यास निधीची आवश्यठकता आहे. सदर कामांमुळे 3
हजार 841 टी.सी.एम इतका पाणीसाठी होणार असून त्याद्वारे 1 हजार 122
हेक्ट्र क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

उपाय-उगमस्थळापासून तीस किलोमीटरपर्यंत वृक्षवेली सुरक्षित आहेत. परंतु
त्याखाली संपूर्ण नदीक्षेत्रात पर्यावरण उपयुक्त अशी झाडे राहिली नाहीत.
त्याऐवजी काटेरी झाडांनी नदी परिसर वेढला आहे. नदीकाठी दोन्ही बाजूला
असणाऱ्या वृक्षवेली नष्ट झाल्या आहे.

1. वृक्ष लागवड- झाडे नष्ट झाल्यामुळे माणनदीच्या परिसरात सध्या पाणी
मुरत नाही. त्यासाठी वृक्ष लागवड करणे हा एकमेव उपाय इसून डोंगरमाथ्यावर
उतारावर लिंब, चिंच, करंज अशा जातींच्या झाडांची लागवड करावी.
नदीपात्रात ओघळलेला गाळ नदीपात्राच्या काठावर भरून घ्यावा नदीकाठच्या
उतारावर अशा झाडे लावावित.

2. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती- माण नदीच्या उगमापासून ते
संगमापर्यंत एकशेपासष्ट किलोमीटरमध्ये नदीपात्रात चौतीस को..बंधारे
आहेत. माणनदी ही अतिउताराने वाहणारी नदी असल्याने तिच्या पाण्याचा
प्रवाहाचा वेग जास्त असल्याने, बंधाऱ्यात पाणीसाठ्याऐवजी माणकट मातीचे थर
चढल्याने, काटेरी झुडपे उपद्रवी वनस्पतींची वाढ झाल्याने, बंधाऱ्याच्या
पाणीसाठ्यात घट झाली आहे.

3. वाळूबचाव- माणगंगा वाचवायची असेल तर त्या नदीने स्वत:च्या
अस्तित्वासाठी मानवी वस्ती उपयुक्ततेसाठी शेकडो वर्षांपासून तयार
केलेली नदीपात्रातील वाळू वाचवली पाहिजे. नदीपात्राचा काही ठिकणाचा भाग
सोडला तर वीस ते तीस फूट खोलीपर्यंत वाळू आहे. पण नदीपात्रात वाळूचोरी,
विक्री तस्करी सुरु आहे. स्थानिक बांधकामासाठी लागणार वाळू नदीपात्रातच
चाळून उपयुक्त तेवढी वाळू न्यावी पण याकडे दुर्लक्ष होत आहे.

4. नद्यांतील अतिक्रमणे- नदीशेजारच्या शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी
अतिक्रमणे करून नदीपात्र संपुष्टात आणले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:
हून नदीपात्रातील अतिक्रमणे काढली पाहिजेत. त्यासाठी शासन स्थरावर कारवाई
करणे आवश्य्क आहे. नदीपात्र सुरक्षित राहिले तर पाणीसाठ्यात वाढ होऊ
शकते.

5. उपद्रवी वनस्पतींचे निर्मूलन- माणदेशात शोक समिंदर नावाची विषारी
उपद्रवी वनस्पती उगवते. ही वनस्पती कितीही दिवस पाणी नसले तरी नरत नाही.
पसरट पाने, फिक्कट गुलाबी पांढरी फुले पोकळ खोड मात्र केसाळ मुळे
असलेल्या या वनस्पतीचे वेळीच निर्मूलन करणे गरजेचे आहे.

6. नदी पात्रात सोडले जाणारे घाणपाणी- नदीकाठच्या गावे उंचवट्यावर , तर
उतार नदीरडे असल्याने सांडपाणी गटारांद्वारे नदीपात्रात सोडले जाते.
त्यासाठी नदीपात्राकडे जाणाऱ्या गटारीच्या बाजूला दहादहा फुटांचे
शोषखड्डे तयार करून गटारीतून वाहणारे पाणी विभागून या शोष खड्यात सोडले
तर नदीकडे जाणारे घाण पाणी थांबेल या ठिकाणच्या मोकळ्या जागेत
वृक्षलागवड करावी.
नदीपात्रात निरुपयोगी साहिती, वस्तू टाकण्यापासून लोकांना परावृत्त केले पाहिजे.
संपूर्ण कार्यात शासन, समाज यांचा सहभाग लाभला पाहिजे. कारण या कामाची
व्याप्ती मोठी आहे. त्यासाठी स्वयंस्फूर्ती, आवडीने ग्रामस्थांनी या

नद्याचे पुनरुज्जीवन केले तरच पुढच्या पिढीला याचा लाभ होणार आहे.

No comments:

Post a Comment